Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी आज देशातील जनतेशी 'मन की बात', (Man Ki Baat) या कार्यक्रमातून संवाद साधला. मोदींनी केंद्र सरकारमध्ये सत्तेत आल्यानंतर दर महिन्याला रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यासाठी 'मन की बात' या कार्यक्रमाची सुरूवात केली. आज पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना NCC दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संपूर्ण देशाने स्विकारला असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

देशातील तरुण 'फ्रेंडशिप डे' कधीच विसरत नाहीत. परंतु, त्यांना NCC कधी असतो आणि तो को साजरा केला जातो, याबद्दल माहिती नसते. 'नॅशनल कॅडेट कॉर्प्स'मुळे आपल्याला शिस्तीचे महत्त्व समजते. माझ्या शाळेत NCC कोर्स होता. त्यामुळे मला विश्वास वाढण्यास आणि शिस्तप्रिय बनवण्यास मदत झाली, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट - 

NCC ही संघटना देशातील सर्वात मोठी संघटना आहे. यात भूदल, नौदल आणि वायू दल या सर्वांचा समावेश असतो. तसेच येणाऱ्या 'फिट इंडिया' आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, क्रिडा, योगासन, डान्स आदी स्पर्धांचे आयोजन केले जाईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या प्रकरणावरील ऐतिहासिक सुनावणीचाही उल्लेख केला. देशातील लोक सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मोठ्या उत्साहाने आणि नवीन आशा-अपेक्षा घेऊन कामाला लागले आहेत. देशातील नागरिकांनी शांती, एकता आणि सद्भवना या भावनेने विकास घडवून आणला पाहिजे, असंही ते म्हणाले.