गाझियाबादमध्ये विद्यार्थ्याला ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं पडलं महागात; 142 रुपयांच्या जेवणासाठी मोजले तब्बल 91 हजार रुपये
परंतु, दिल्लीतील गाझियाबादमध्ये एका विद्यार्थ्याला ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं चांगलचं महागात पडलंय. सिद्धार्थ नावाच्या विद्यार्थ्याला 142 रुपयांच्या जेवणासाठी तब्बल 91 हजार रुपये मोजावे लागले आहेत. सिद्धार्थने काठी रोल आणि एक रूमाली रोटी ऑनलाईन ऑर्डर केली होती. परंतु, बराच वेळ झाला मात्र जेवण आलं नाही. म्हणून त्याने अॅपवर जेवणाबाबत माहिती मागितली.
अलिकडे ऑनलाईन जेवण ऑर्डर (Online Food Order) करण्याचं प्रमाण वाढल आहे. परंतु, दिल्लीतील गाझियाबादमध्ये (Ghaziabad) एका विद्यार्थ्याला ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं चांगलचं महागात पडलंय. सिद्धार्थ नावाच्या विद्यार्थ्याला 142 रुपयांच्या जेवणासाठी तब्बल 91 हजार रुपये मोजावे लागले आहेत. सिद्धार्थने काठी रोल आणि एक रूमाली रोटी ऑनलाईन ऑर्डर केली होती. परंतु, बराच वेळ झाला मात्र जेवण आलं नाही. म्हणून त्याने अॅपवर जेवणाबाबत माहिती मागितली.
दरम्यान, या अॅपवर सिद्धार्थने जेवण डिलीवर झाल्यानंतर नाकारल्याच सांगण्यात आलं. त्यामुळे सिद्धार्थने कस्टमर केअरला फोन केला. मात्र, कस्टमर केअरचा फोन लागत नसल्यामुळे याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. तेवढ्यात सिद्धार्थला कस्टमर अॅपच्या नंबरवरून फोन आला. या कस्टमर केअरने सिद्धार्थचे पैसे परत करायचे असं सांगून ऑनलाईन पेमेंटचे डिटेल्स मागितले. परंतु, त्यानंतर लगेचच सिद्धार्थला त्याच्या अकाऊंटमधून 91 हजार 196 रुपये काढल्याचा मॅसेज आला. (हेही वाचा - मुंबईतील दोन शास्त्रज्ञांची ऑनलाइन फसवणूक)
सिद्धार्थच्या अकाऊंटमधून एकूण 7 वेळा ट्रांजेक्शन करून तब्बल 91 हजार 196 रुपये काढण्यात आले. या गंभीर प्रकारानंतर सिद्धार्थने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी याबाबत तक्रार लिहून घेतली आहे. या घटनेमुळे ऑनलाईन जेवण ऑर्डर करणं सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे. या अगोदरही अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत. अनेक ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.