Coronavirus Update: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 40 टक्के घट; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांची माहिती
Lav Aggarawal (Photo Credit: ANI)

कोरोना विषाणूने (COVID19) संपूर्ण भारतात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 15 मार्च ते 31 मार्च या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि 1 एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचे दिसते आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल (Lav Aggarawal), यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. दरम्यान, देशातील कोरोना चाचणीची संख्या वाढली आहे. मात्र, करोना रुग्णांच्या संख्येत 40 घट झाल्याचे दिसून आले आहे, अशी माहीती लव अग्रवाल माहिती दिली आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. 170 हून अधिक देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत. यात भारताचाही समावेश आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने देशापुढे मोठे आव्हान उभे आहे. मात्र, आता भारताची परिस्थिती सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच येत्या काळात कोरोना विषाणूवर विजय मिळवत येईल असेही, अश्वासन अग्रवाल यांनी दिले आहेत. देशभरात करोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 7 ने वाढली आहे. ही बाब निश्चितच काळजी वाढवणारी आहे. मात्र, करोनाग्रस्तांचे प्रमाण हे 40 टक्के घटले आहे. ही बाब काहीशी दिलासा देणारी आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 1007 नवे कोरोनाचे रुग्ण तर 23 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

COVID-19 Update: महाराष्ट्रात २८८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; रुग्णांचा आकडा पोहचला ३२०५ वर : Watch Video 

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.