Gold Rates Today: सोन्याच्या दरात 4 हजारांची वाढ; जाणून घ्या आजची किंमत
Gold | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतात कोरोना विषाणूच्या रुपात मोठे संकट उभा राहिले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान सोन्याच्या भावात प्रचंड वेगाने चढ उतार होऊ लागले आहे. मात्र, देशात संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर गेल्या काही दिवसांतच सोन्याचे दर पुन्हा उंचावले आहेत. सध्या सोन्याचे दराने प्रति 10 ग्रॅम 42 हजाराचा आकडा गाठला आहे. महत्वाचे म्हणजे, केंद्र सरकार आणि सेंट्रल बॅंक यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या अनेक उपाययोजनांमुळे आता सोन्याला पुन्हा एकदा चांगला दर मिळू लागला आहे. पण सोन्याच्या किंमतीत वाढ होत असली तरीही लॉक डाऊच्या स्थितीमुळे सोन्याला मागणी नाही अशीच स्थिती भारतात आहे.

कोरोना विषाणूमळे जागतिक पातळीवर आजही रुपया घसरण झाली आहे. याचाच परिणाम सोन्यावरही पडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, या आठवड्यात सोन्याच्या दरात सरासरी 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे दर 42 हजार 430 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. पण ग्राहकांना करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोने खरेदीसाठी बाहेर पडता येत नाही. म्हणून सोन्याच्या मागणीवर याचा परिणाम झाला आहे. याशिवाय, चांदीच्या भावात घट झाली आहे. चांदीमध्ये प्रति किलोमध्ये 360 रूपये किंमतीची घट पहायला मिळाली. चांदीचा प्रति किलोमागील भाव हा 41 हजार 150 रूपये इतका होता. हे देखील वाचा- Gold Rate Today: सोन्याचे भाव आज पुन्हा झाले कमी; पाहा मुंबई, पुणे, नाशिक शहरातील दर

बुधवारी 25 मार्च रोजी सोन्याचा भाव मुंबईत प्रति 10 ग्रॅम मागे 41,647 रुपये इतका होता. तर, दिल्ली मध्ये सोने प्रति 10 ग्राम 41,942 या किंमतीवर होते. वास्तविक सोन्याच्या दरात जरी झळाळी आली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या संचारबंदीमुळे सोने व्यवसायाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. दुसरीकडे 24 आणि 25 चांदीचा भाव तारखेला भाव प्रति किलो दर 50,800 इतकी किंमत होती.