मुस्लिम तरुणींची हिंदू पद्धतीने बांधली लग्नगाठ
लग्नगाठ ( फोटो सौजन्य - Pixabay)

प्रत्येक समाजामध्ये लग्नासंबंधित विवध परंपरा आणि रुढींचा मान ठेऊन लग्नसोहळा पार पाडला जातो. मात्र लखनऊ मध्ये चार अनाथ मुस्लिम तरुणींची लग्नगाठ ही हिंदू परंपरने बांधली गेली आहे. लखनऊमधील कल्याण भवनात हा लग्नसोहळा पार पडला आहे. तर या लग्नसोहळ्याचे आयोजन समाज कल्याण विभागाने केले होते.

लखनऊमध्ये कार्यरत असलेल्या समाज कल्याणच्या विभागाने चार अनाथ मुलींची लग्न हिंदू परंपरेनुसार करविण्याचे ठरविले. तसेच या लग्नसोहळ्यासाठी हिंदू परंपरेनुसार वधू आणि वर यांनी वस्त्रे परिधान केले होते. तसेच समाज कल्याणने आयोजित केलेल्या या लग्नसोहळ्यात एकूण 27 तरुणींचा समावेश होता. मात्र त्यातील या चार मुस्लिम तरुणींचे ही लग्न हिंदू पद्धतीने लावून देण्यात आले आहे. यामुळे या अनाथ मुस्लिम तरुणींच्या चेहऱ्यावर लग्नसोहळ्याच्या वेळी आनंद दिसून येत होता.

तर समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना या लग्नसोहळ्यातील तरुणींबद्दल विचारले असता, 'या तरुण मुलींना वयाचा 6-10 वर्षात आमच्या येथे आणले गेले होते. मात्र शेल्टर होममध्ये राहून ही त्यांनी अनाथ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आम्ही या मुलींचे पालनपोषण केले' असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर या लग्न झालेल्या सर्व तरुणींना लग्नसोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या मंडळींकडून लग्नाच्या खुप शुभेच्छा दिल्या आहेत.