Asif Khan Arrested: माजी आमदार आणि काँग्रेस नेते आसिफ खान यांना अटक; दिल्ली पोलिसांच्या एसआयला धमकी दिल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई
Asif Khan (PC - ANI/ Twitter)

Asif Khan Arrested: माजी आमदार आणि काँग्रेस नेते आसिफ मोहम्मद खान (Asif Khan) यांना एका व्हायरल व्हिडिओमध्ये एसआयसह दोन दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे. याप्रकरणी शाहीनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यासोबतच अन्य दोन आरोपी मिन्हाज आणि साबीर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या अन्य आरोपींच्या शोधात छापे टाकण्यात येत आहेत.

डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना तय्यब मशिदीजवळ 20-30 लोकांचा जमाव दिसला. जवळ गेल्यावर पाहिलं तर त्यावेळी एमसीडीमध्ये काँग्रेसचे नगरसेवक उमेदवार, आरीबा खान यांचे वडील आणि माजी आमदार आसिफ मोहम्मद खान त्यांच्या समर्थकांसह होते आणि ते माईकवरून उपस्थित लोकांना संबोधित करत होते. (हेही वाचा - Dr S Jaishankar on 26/11 Mumbai Attacks: दहशतवाद हा मानवतेला धोका आहे; 26/11 च्या हल्ल्यावर डॉ. एस जयशंकर यांची प्रतिक्रिया)

पोलिस अधिकाऱ्याने आसिफ यांना निवडणूक आयोगाच्या परवानगीबद्दल विचारले तेव्हा आसिफ खान आक्रमक झाले आणि शिवीगाळ करू लागले. आसिफ यांनी शिवीगाळ करून पोलिसांना मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एसआयसह तीन पोलिस लोकांच्या मध्ये उभे आहेत आणि असिफ खान त्यांना लाऊडस्पीकरद्वारे धमकावत आहे. यादरम्यान आसिफचे समर्थक या पोलिसांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर शाहीनबाग पोलिसांनी उपनिरीक्षक अध्यक्षांच्या तक्रारीवरून आसिफ खान आणि इतर काही जणांविरुद्ध कलम 186, 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला.