Tarun Gogoi Passes Away: असमचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते तरुण गोगोई यांचे आज निधन; राज्याचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची माहिती

राज्याचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी याबाबत माहिती दिली आहे. तरूण गोगोई हे 86 वर्षाचे होते.

Tarun Gogoi (Photo Credit: ANI)

असमचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते तरुण गोगोई (Tarun Gogoi) यांचे आज निधन झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी याबाबत माहिती दिली आहे. तरूण गोगोई हे 86 वर्षाचे होते. गुवहाटी येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसेच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र,  उपचारादरम्यान आज सायंकाळी 5 वाजून 34 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तरूण गोगोई यांच्या निधनाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते शोकाकूल झाले आहेत.

तरुण गोगोई यांना 2 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे दुसर्‍याच दिवशी (3 ऑगस्ट) त्यांना जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर, 25 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्यावर पोस्ट कोव्हिड उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गोगोई यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. रविवारी त्यांचे डायलिसिसही करण्यात आले होते. तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास जाणवत होता. शनिवारी गोगोई यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हे देखील वाचा- Satish Dhupelia Passes Away: महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन

एएनआयचे ट्वीट-

गोगोई हे तीन वेळा असामचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. गोगोई यांच्या रुपात अनुभवी नेता गमवल्याने काँगेसच्या पक्षाला मोठा धक्का लागला आहे. गोगोई यांच्या निधनाच्या बातमीनंतर राजकीय नेत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.