दिल्लीत सिंलेंडरच्या स्फोटामुळे पसरले भीषण आगीचे साम्राज्य
फोटो सौजन्य- Pixabay

दिल्लीतल्या मोरी गेट येथील राम नगर मार्केटजवळील एका घरात मंगळवारी सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तसेच आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाने तातडीने उपस्थित राहून आपले कार्य करण्यास सुरुवात केली.

मंगळवारी राम नगर मार्केटच्या जवळील एका घरात संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या घटनेमुळे घराजवळ राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच या आगीमुळे अजून 4-5 सिलेंडरचा स्फोट होऊन ती सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली असल्याचे तेथील स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितले आहे. तर तेथील स्थानिक घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मात्र अग्निशमन दलाने अथांग प्रयत्न केल्यानंतर त्यांना आग विझवण्यास यश आले. तसेच या घटनेमध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे. तर ही आग लागण्यामागील नेमके कारण काय असावे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात  आहे.