Mumbai Most Expensive City for Expats: मुंबई ठरले स्थलांतरीत नागरिकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर; आशियामध्ये 21 व्या क्रमांकावर, दिल्ली कोणत्या स्थानावर घ्या जाणून
त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. मर्सरच्या ‘2024 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे’ अहवालात दिसून आले. मुंबई सहाव्या स्थानांवर झेप घेतली आहे तर दिल्लीने दोन स्थानांची बढती घेतली आहे.
Mumbai Most Expensive City for Expats: मर्सरच्या ‘2024 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे’ नुसार, मुंबई आता परदेशी नागरिकांसाठी जे कामानिमित्त मुंबईत राहिले आहेत. अशांसाठी महागडे शहर असल्याचे समोर आले आहे. मुंबई आशियातील सर्वात महागडे शहर म्हणून 21 व्या क्रमांकावर आहे तर दिल्ली सर्वेक्षण केलेल्या शहरांमध्ये 30 व्या स्थानावर आहे. त्यामुळे आशियामध्ये, मुंबई आणि दिल्लीने क्रमवारीत वरता स्तर अनुभवला आहे. मुंबईने सहा क्रमांकाची झेप घेतली आहे तर दिल्लीने दोन स्थानांची बढती घेतली आहे. (हेही वाचा:Mercer's 2020 Cost of Living Survey: देशात मुंबई ठरले बाहेरच्या लोकांसाठी Most Expensive City, तर जगात Hong Kong ने मारली बाजी; पहा जगातील Top 10 महागडी शहरे )
'जागतिक आर्थिक आव्हानांचा सामना करताना, भारत मोठ्या प्रमाणात लवचिक राहिला आहे', तसेच 'भारतीय अर्थव्यवस्थेने लक्षणीय वाढ अनुभवली आहे, प्रामुख्याने देशांतर्गत भरभराट होत असलेल्या सेवा क्षेत्रातून दिसत आहे', असे मर्सर येथील इंडिया मोबिलिटी लीडर राहुल शर्मा यांनी म्हटले.(हेही वाचा: Most Expensive City in India for Expats: मुंबई ठरले स्थलांतरीत लोकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर; वर्षभरात घरभाड्यात झाली 15-20 टक्के वाढ)
'रोजगार वाढ, वाढता मध्यमवर्ग आणि एकूणच आर्थिक वाढ यासारख्या घटकांचा देशातील राहणीमानाच्या खर्चावर सकारात्मक परिणाम झाला', असे सर्वेक्षणात म्हटले आहे. 'मुंबईच्या क्रमवारीत वाढ होत असून, याचा भारतीय कंपन्यांसाठी महत्त्वाचा फायदा होत आहे,' असे शर्मा यांनी नमूद केले. जागतिक स्तरावर, हाँगकाँगने पुन्हा एकदा राहण्यासाठी सर्वात महागडे शहर म्हणून अव्वल स्थानावर दावा केला आहे. तर मुंबईने 11 स्थानांची बढती करत जागतिक स्तरावर 136 वे स्थान मिळवले आहे.
रँकिंगमधील इतर भारतीय शहरांमध्ये नवी दिल्ली (164) 4 स्थानांनी वर आली आहे. चेन्नई (189) 5 स्थानांनी घसरली आहे. बेंगळुरू (195) 6 स्थानांनी घसरली आहे. हैदराबाद (202) स्थिर आहे. पुणे (205) स्थितीत 8 स्थानांची वाढ झाली आहे. आणि कोलकाता (207) स्थानावर 4 स्थानांनी वाढ झाली आहे. खर्चाच्या बाबतीत मुंबई आणि पुणे सर्वात महाग आहेत, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.