UPSC Civil Service Exam Prelims 2020 Admit Card: यूपीएससी पूर्व परीक्षा यंदा 4 ऑक्टोबरला; upsc.gov.in वरून डाऊनलोड करा प्रवेशपत्र
UPSC Representational Image (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाला देखील फटका बसला आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा युपीएससीच्या (Union Public Service Commission) परीक्षांचेदेखील वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता 4 ऑक्टोबरला होणार्‍या युपीएससीच्या पूर्व परीक्षांसाठी प्रवेश पत्र (UPSC Civil Service Exam Prelims  Admit Card) upsc.gov.in या यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या हे अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. यंदा कोरोनाच्या सावटाखालीच देशात लाखो विद्यार्थी युपीएससीची परीक्षा देणार आहेत. UPSC NDA 2020 Admit Card: युपीएससी कडून NDA, NA 2020 परीक्षांची अ‍ॅडमिट कार्ड्स रीलीज upsc.gov.in वरून अशी करा डाऊनलोड.  

UPSC Civil Service Exam Prelims 2020 Admit Card कसे डाऊनलोड कराल?

  • upsc.gov.in ही युपीएससीची वेबसाईट ओपन करा.
  • UPSC civil service prelims 2020 अ‍ॅडमिट कार्डच्या नोटिफिकेशनवर क्लिक करा.
  • तुम्हांला काही अत्यावश्यक माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर अ‍ॅडमिट कार्डसाठी एक विंडो ओपन होईल. त्याद्वारा तुम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.

दरम्यान भारतामध्ये युपीएससीची परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते. प्रथम पूर्व परीक्षा परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत. याचे एकत्र गुण अंतिम निकालात दिसतात. मार्कांच्या आधारे IAS, IFS,IPS अधिकार्‍यांची निवड केली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी त्यासाठी मेहनत घेत असतात.