IPL Auction 2025 Live

SSC CHSL 2019 Result आज जाहीर होण्याची शक्यता; ssc.nic.in वर असे पहा मार्क्स

कमिशन कडून ही Tier II exam 14 फेब्रुवारी 2021 रोजी घेतली जाणार आहे.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

आज स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)Combined Higher Secondary Level (CHSL) Tier 1 परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान ज्या परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांचे SSC CHSL result 2019 आज ssc.nic.in या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येऊ शकतात.

दरम्यान एसएससी ने CHSL Tier 1 exam कोविड 19 संकटात 17 मार्च दिवशी घेतली होती. त्यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात 12, 16, 19, 21आणि 26 तारखेला परीक्षा देण्याची संधी दिली होती. ज्यांचा मार्च महिन्यातला चान्स हुकला होता त्यांना ऑक्टोबर महिन्यात संधी देण्यात आली होती. तर 6 नोव्हेंबरलाच या परीक्षेची आन्सर की देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसएससी ने स्टेट्स रिपोर्ट्समध्ये SSC CHSL 2019 tier 1 exam ची निकालाची तारीख 15 जानेवारी कळवली आहे.

SSC CHSL 2019 Result कसा पहाल?

तुमचे मार्क्स पाहण्यासाठी तुम्हांला लॉगिंग करावं लागेल. त्यासाठी अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ आवश्यक आहे.

दरम्यान Tier I exam उत्तिर्ण झालेल्यांना Tier II exam देता येणार आहे. कमिशन कडून ही Tier II exam 14 फेब्रुवारी 2021 रोजी घेतली जाणार आहे. या रिक्रुटमेंट ड्राईव्ह मधून 4893 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये 126 जागा एलडीसी साठी आहेत. 3598 जागा पीए/ एसए साठी अअहेत. 26 जागा या डीईओ आहेत.