Mumbai School Reopen: आजपासुन मुंबईतील शाळा सुरु, शाळेकडून सर्व खबरदारीचे पालन
ऑनलाइन शालेय शिक्षणापेक्षा शारीरिक शिक्षण चांगले आहे. शाळेने सर्व खबरदारी घेतली आहे," असे पालकांनकडून सांगण्यात आले.
मुंबई: राज्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असुन मुंबईत आजपासुन पाहिले ते सातवीचे वर्ग सुरु झाले आहे. महापालिकेचे शिक्षणधिकारी राजु तडवी (Raju Tadavi) यांनी मुंबई महापालिकेतील शाळा बुधवार पासुन सुरु (Mumbai School Reopen) होतील असा आदेश जारी केला होता. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मुंबईच्या वडाळा भागातील AES शाळेचे दृश्य बघता "मुले पुन्हा एकदा शाळेत जाण्यात आनंदी आहेत. ऑनलाइन शालेय शिक्षणापेक्षा शारीरिक शिक्षण चांगले आहे. शाळेने सर्व खबरदारी घेतली आहे," असे पालकांनकडून सांगण्यात आले.
Tweet
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, असा संभ्रम पालकांन मध्ये होता. पण शाळा कोणत्याही परिस्थितीत सुरु होतील आणि त्यात कोणताही बदल होणार नाही असे शिक्षण विभागाने सांगितले होते. मुंबईतील बहुसंख्य पालक हे नोकरदार असून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे ते कामाच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्यास तयारीसाठी शाळांनी एक दिवस आधी पालकांना सूचित करणं आवश्यक असल्याचं पालकांचे म्हणणं आहे. मात्र काही शाळा अद्याप शिक्षण विभागाच्या नव्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संभ्रमाचं वातावण निर्माण झालं होतं. (हे ही वाचा Covid-19 Vaccine: तीन वर्षांवरील मुलांना पुढील सहा महिन्यात कोरोना लस - आदर पुनावाला.)
महापालिकेच्या आदेशानुसार शाळेत मुलाच्या व्यवस्थापनाची पुर्णपणे तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन बॅचेसमध्ये शाळेत बोलवावं लागणार आहे. काही ठिकाणी ओमायक्रोनच्या भितीने विद्यार्थ्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याच चित्र आहे. काही पालक अजूनही ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवण्याच्या विनंती मध्ये आहे असे काही शाळाप्रमुखांनी सांगितलं आहे. काही पालकांनी शाळा नव्या वर्षात सुरु करावी, अशी भूमिका घेतलीय.