JEE Main Session 1 Result 2022 Declared: जेईई मेन्स सेशन 1 चा निकाल jeemain.nta.nic.in वर जाहीर; असे पहा मार्क्स
The National Testing Agency अर्थात NTA कडून यंदा घेण्यात आलेल्या JEE Main Session-1 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
The National Testing Agency अर्थात NTA कडून यंदा घेण्यात आलेल्या JEE Main Session-1 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना जन्मतारीख, अॅप्लिकेशन नंबर टाकून लॉग इन करावं लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार यंदा 7 लाख विद्यार्थ्यांनी JEE Mains Session 1 Exams दिली होती. यामध्ये आता JEE Main 2022 Exam उत्तीर्ण होणार्यांना JEE Advanced 2022 Exam साठी पात्र केले जाते. काही दिवसांपूर्वीच JEE Main 2022 Session 2 साठी रजिस्ट्रेशन बंद करण्यात आले आहे. ही परीक्षा 21 जुलै ते 30 जुलै 2022 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: NEET 2022 Exam City Slips जारी; neet.nta.nic.in वरून अशी करा डाऊनलोड .
पहा ट्वीट
कसा पहा जेईई मेन्सचा निकाल
- JEE ची अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in किंवा NTA ची वेबसाईट nta.ac.in ला भेट द्या.
- होम पेजवर 'JEE Main 2022 result'च्या लिंक वर क्लिक करा.
- आता नव्या पेजवर तुमचे लॉगिन डिटेल्स सबमीट करा.
- आता तुमचा स्क्रिनवर दिसेल.
- हा निकाल तुम्ही डाऊनलोड करू शकता.
या डिरेक्ट लिंक वर देखील तुम्ही जेईई मेन्स 2022 सेशन 1 चा निकाल पाहू शकता.
दरम्यान जनरल कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना किमान 75% अॅग्रिगेट्स मिळवणं आवश्यक आहे तेव्हाच ते सेशन 1 क्वालिफाय करू शकतात. दरम्यान SC/ST/PWD वर्गासाठी ही मर्यादा 65% आहे.