Sansad TV (PC-wikimedia commons)

Youtube ने Sansad TV चे अधिकृत खाते बंद केले आहे. ज्यानंतर वापरकर्त्यांना खाते उघडताच कोणताही व्हिडिओ दिसत नाही आहे. त्याऐवजी युट्युबच्या वतीने संसद टीव्हीच्या पेजवर मेसेज दाखवला जात आहे. ज्यामध्ये 'हे ​​अकाऊंट यूट्यूबच्या कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्यामुळे बंद करण्यात आले आहे' असे लिहिले आहे. मात्र, संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आल्याचे सत्य समोर आले आहे. सरकारने त्यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे.

संसद टीव्हीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सरकारने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची पुष्टी झाली आहे की, संसद टीव्हीचे YouTube 15 फेब्रुवारी 2022 रोजी हॅक झाले होते आणि YouTube सुरक्षा धोक्यांकडे लक्ष देत आहे. या समस्येचे शक्य तितक्या लवकर निराकरण केले जाईल. (वाचा -ICSE, ISC Term 2 Exams 2022: CISCE च्या दहावी, बारावीच्या टर्म 2 च्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात!)

संसद टीव्हीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, हा मुद्दा इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) च्या नोटिस अंतर्गत आहे. संसद टीव्हीला त्यांच्याकडून चेतावणी देण्यात आली आहे. CERT-In भारतातील सायबर सुरक्षेच्या बाबी पाहते. CERT-in व्यतिरिक्त, YouTube देखील या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे.