Delhi Assembly Election Results 2020: दिल्लीत पुन्हा काँग्रेसच्या हाती मोठी निराशा; विधानसभा निवडणुकीची टक्केवारी जाहीर
Congress President Sonia Gandhi and MP Rahul Gandhi (Photo Credits: PTI)

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 (Delhi Assembly Election Results 2020) निकाल आज जाहीर होत असून या निवडणुकतही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची जादू दिसत आहे. नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणुकीची टक्केवारी जाहीर झाली असून यात काँग्रेसच्या (Congress) हाती मोठी निराशा लागल्याचे चिन्ह दिसत आहेत. तत्पूर्वी मतदानांतर विविध माध्यमांच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी (AAP) पक्षाचेच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. तर, भाजपाला (BJP) 5 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता दर्शवली होती. याचबरोबर मागील वेळी एकही जागा न मिळालेल्या काँग्रेसला यावेळी किमान 4 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, अद्याप काँग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याचे समजत आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण 672 उमेदवार मैदानात उतरले आहेत. ज्यात 593 पुरूष तर, 79 महिलांचा समावेश आहे. या निवडणुकीत एकूण 62.49 टक्के मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 5 टक्के कमी मतदान झाले आहे. प्रमुख लढत आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीतही आप सरकारच येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भाजपने काही जागेवर आघाडी घेतली असून अजूनही काँग्रेस संघर्ष करत असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Delhi Vidhan Sabha Election Results 2020: राजधानी दिल्लीत 'अब की बार किसकी सरकार?' अरविंद केजरीवाल विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी सामन्याचा आज लागणार निकाल

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पार्टीला म्हणजेच आपला 5 ते 63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणूक ही भाजपा आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 36 जागेवर विजय मिळवून बहुमतांचा आकडा गाठवा लागेल. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैंकी 67 जागेवर विजय मिळवला होता.