Ladakh Five New District: लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची निर्मीती; विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

Ladakh Five New District: केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर त्याबाबतची माहिती दिली. 'विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार गृह मंत्रालयाने केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.' असे अमित शाह यांनी म्हटले. येत्या काही दिवसात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडत आहेत. त्यापूर्वी लडाखसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लेह आणि कारगिल हे दोन जिल्ह्यांच्या प्रदेशात आता नवीन पाच जिल्हे झाले आहेत. त्यामुळे लडाख (Ladakh)सात जिल्ह्यांचा प्रदेश झाला आहे. (हेही वाचा: Jammu & Kashmir Assembly Elections 2024: जम्मू कश्मीर विधान सभा निवडणूकींसाठी भाजपा ने जाहीर केली 44 उमेदवारांची यादी!)

गृह मंत्रालयने केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. आता लडाखमध्ये दोन ऐवजी पाच जिल्हे असणार आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग यांचा समावेश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांना त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. लडाखमधील लोकांसाठी शिक्षण, रोजगाराच्या, समृद्ध जीवनाच्या संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.

भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले होते. त्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख वेगवेगळे केले होते. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिला तर लडाख केंद्रशासित प्रदेशच ठेवले. त्यापूर्वी लडाख हा जम्मू-काश्मीरचा भाग होता. सध्या लडाखमध्ये दोन जिल्हे आहेत.

अमित शाह यांची पोस्ट

नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतूक

पंतप्रधान मोदी यांनी लडाखमध्ये पाच जिल्हे निर्माण करण्याचा गृहमंत्रालयाच्या निर्णयाचे कौतूक केले आहे. लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक गतीमान होणार आहे. लडाखच्या समृद्धीच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे. या भागावर आता अधिक लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना अधिक संधी मिळणार आहे. या भागातील लोकांचे अभिनंदन…



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif