COVID-19 Spike: महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकसह 'या' 10 राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर, मृतांचा आकडा चिंताजनक
Coronavirus | Representational |(Photo Credits: IANS)

भारतात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus In India) दुसऱ्या लाटेने सर्वांना हादरून सोडले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकार आणि प्रशासनावर मोठा ताण येत असल्याचे दिसत आहे. तसेच ऑक्सिजन, लस, बेड उपलब्ध नसल्याने देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हेतर, दररोज लाखो लोक कोरोनाच्या तडाख्यात सापडत असून अनेक कुटुंब उघड्यावर आली आहे. देशात गेल्या 24 तासात 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 3 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सर्वाधिक महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), कर्नाटक (Karnataka), केरळ (Kerala), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), तमिळनाडू (Tamil Nadu), पश्चिम बंगाल (West Bengal), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि बिहारमध्ये (Bihar) सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद केली जात आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि बिहार या 10 राज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या 10 राज्यात कोरोना रुग्णांची 73.71 टक्के नोंद झाली आहे. हे देखील वाचा- कोविड-19 रुग्णांसाठी Rahul Gandhi यांनी लॉन्च केली 'Hello Doctor' हेल्पलाईन

महाराष्ट्रात काल 62 हजार 919 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कर्नाटक- 48 हजार 296, केरळ- 37 हजार 199 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्युची नोंद झाली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातील मृतांची संख्या 828 होती. त्यानंतर दिल्लीत 375 तर, उत्तरप्रदेशमध्ये 332 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाख 01 हजार 993 नवे रुग्ण सापडले आहेत. तर, 3 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर पोहचली आहे. यापैकी 2 लाख 11 हजार 853 रुग्णांना मृत्यू झाला आहे. तर, 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 रुग्ण कोरोना उपचारानंतर बरे झालेले आहेत. भारतात सध्या 32 लाख 68 हजार 710 कोरोना रुग्ण सक्रीय आहेत.