मोदी मंत्रीमंडळ (फोटो सौजन्य-PIB)

कोरोना विषाणूवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्याकरिता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन (Lockdown) घोषीत केली होती. आता लॉकडाउन समाप्त होण्यासाठी केवळ एक आठवडाच शिल्लक राहिला आहे. यामुळे 14 एप्रिलनंतर लॉकडाउन वाढवणार की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावर देशातील मुख्यमंत्र्यांसह काही तज्ज्ञांनीही लॉकडाऊनबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसेच देशात लॉकडाउन वाढवणे गरजेचे असल्याचे सरकारला म्हटले होते. या मागणीवर सरकारने विचार सुरू केला आहे. यामुळे येत्या 14 एप्रिलनंतर देशात पुन्हा लॉकडाउन वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केला होता. आज लॉकडाउनला 14 दिवस पूर्ण झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे लॉकडाउनच्या काळात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लॉकडाउन वाढवणे गरजेचे असल्याचे सरकारला म्हटले होते. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot), मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत जाहीर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार करु शकते. सध्या देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या आसपास पोहचली आहे. अजूनही इतर देशांच्या तुलनेत मोठा उद्रेक झालेला नाही, मात्र संख्या अजून स्थिर होताना दिसत नाही. त्यामुळे ज्यावेळी वेग मंदावेल त्याचवेळी मोठा दिलासा मिळेल. हे देखील वाचा-Coronavirus: भारताने सर्व राष्ट्रांना मदत करावी, मात्र प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत; राहुल गांधी

एएनआयचे ट्वीट-

नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यामातून लॉकडाउनबाबत भाष्य केले होते. त्यावेळी लॉकडाउन वाढवणार नसल्याचे त्यांनी संकेत दिले होते. मात्र, अनेक राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लॉकडाउन वाढवण्याच्या मागणीवर विचार करण्यात येत आहे.