ओडिशामध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो

ओडिशामध्ये सुसाट वेगाने येणाऱ्या ट्रकने एका गाडीला धडक दिली असून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घडना सोमवारी रात्री घडली आहे. तर या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

ओडिशाच्या नुवापाडा जिल्ह्यातील कोमना येथून एका गाडीतून 10 जण भजनाच्या कामर्यक्रमावरुन घरी येत होते. त्यावेळी रात्री 2.30 च्या सुमारास समोरुन सुसाट वेगाने येणारा ट्रक या गाडीवर जोरात आढळला. त्यामुळे गाडीतील भजन मंडळींचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची बातमी कळताच घटनास्थळी पोलिसांनी लगेच धाव घेतली. तर पोलिसांनी या अघाताची चौकशी केल्यावर त्यांना या गाडीतील मंडळी भजनावरुन घरी येत असल्याचे सांगितले.

तसेच या घटनेतील मृत झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. तर पोलिसांकडून या अपघाताची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.