ऑपरेशन थियेटर मधून भटक्या कुत्र्याने पळवला रुग्णाचा कापलेला पाय
फोटो सौजन्य- Unsplash

बिहारमध्ये आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे चक्क ऑपरेशन थियेटरमधून कुत्र्याने रुग्णाचा कापलेला पाय पळवल्याची विचित्र घटना घडली आहे. तर रुग्णालयाच्या वरिष्ठांनी या घटनेतील आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

रामनाथ मिश्रा असं या रुग्णाचे नाव आहे. ते बिहारमधील बक्सर येथून आरा येथे रेल्वेने जाण्यास निघाले होते. मात्र प्रवासाच्या दरम्यान त्यांचा पाय घसरल्याने ते रेल्वेखाली आले. या घटनेत रामनाथ यांचा एक पाय आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारावेळी डॉक्टरांनी रामनाथ यांचा एक पाय काढून बाजूला ठेवला होता. त्याचवेळी ऑपरेशन थियेटरमध्ये एका भटक्या कुत्र्याने आतमध्ये येऊन रामनाथ यांचा कापलेला पाय पळवला आहे. तर उपचारादरम्यान रामनाथ यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची मृत पावलेल्या रामनाथ यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयतील डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त केला आहे.