प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सुरतमध्ये (Surat) नुकत्याच झालेल्या अग्निकांडात (Fire) तब्बल 20 विद्यार्थी ठार झाले. त्यानंतर प्रशासनाला जाग येऊन, गुजरात सरकारने अग्निशमन सुरक्षा मानदंडाच्या (Fire safety) आधारावर राज्यात अनेक कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश जारी केले. या ऑर्डरनंतर सुरक्षा मानके पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, ट्यूशन सेंटरच्या मालकांनी बागेत, सरकारी कार्यालयांच्या कंपाऊंड्समध्ये इतकेच काय तर अगदी स्मशानभूमीतही (Graveyard) क्लासेस घ्यायला सुरुवात केली आहे. बनासकांठा (Banaskantha) जिल्ह्यातील पालनपुर स्मशानभूमित क्लासेस चालत आहे. विद्यार्थ्यांनाही नाईलाजाने इथे येऊन शिकावे लागत आहे. आज तक या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

सूरत येथे झालेल्या अग्नितांडवानंतर अनेक क्लासेस मध्ये कोणत्याही प्रकारची फायर सेफ्टी नसल्याचे समोर आले होते. त्यानातर सरकारने अशाप्रकारे सर्व क्लासेस बंद करवले होते. त्यामुळे कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांनी जेथे जागा मिळेल तिथे क्लासेस भरवणे सुरु केले आहे. ज्या क्लासेस मध्ये फायर सेफ्टी आहे अशाच क्लासेसना परवानगी दिली गेली आहे. याबाबत पालनपुरच्या एका विद्यार्थ्याने सांगितले, ‘आम्ही जिथे क्लासेससाठी जातो तिथे सर्व प्रकारची फायर सेफ्टी बसवण्यात आली आहे तरी सरकारने त्या क्लास ला एनओसी दिला नाही. यामुळे स्मशानभूमीत क्लासेससाठी येण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.

(हेही वाचा: शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग, 20 जणांचा मृत्यू)

दरम्यान, 24 मी रोजी सुरत येथे सरथाणा परिसरात असलेल्या तक्षशीला इमारतीला संध्याकाळी भीषण आग लागली होती. ज्या मजल्यावर आग लागली होती त्याचे छत फायबरचे होते त्यामुळे ही आग सर्वत्र पसरली. या मजल्यावर कोचिंग क्लासेस चालू असल्याने, या आगीत तब्बल 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.