स्टॅचू ऑफ युनिटी नंतर भारतात आकार घेतीय जगातील सर्वात उंच शंकराची मूर्ती
कैलाशनाथ नेपाळ (Photo credit : YouTube)

स्टॅचू ऑफ युनिटी (statue of unity) या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. 182 मीटर उंचीच्या हा सरदार पटेल यांचा पुतळा नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा पुतळा अंतराळातूनही दिसतो. याच धर्तीवर आता राजस्थान येथे भगवान शंकराचा सर्वात उंच पुतळा (मूर्ती)  उभारण्यात येत आहे. या मूर्तीची उंची तब्बल 351 फुट असणार आहे. या पुतळ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हा पुतळा पूर्णपणे तयार होईल.

राजस्थानमधील उदयपूरजवळ श्रीनाथद्वारामध्ये ही शंकराची भव्य मूर्ती आकार घेत आहे. या मूर्तीसाठी आतापर्यंत 2600 टन स्टील, 2601 टन लोहा आणि  26618 क्यूबिक मीटर सीमेंट आणि कॉन्क्रीटचा वापर केला गेला आहे. या प्रोजेक्टच्या सीनियर मॅनेजर मुनीश नासा यांनी सांगितले की, या मूर्तीच्या डिझाइनची विंड टनल टेस्ट (उंचीवर हवा) ऑस्ट्रेलियात झाली आहे. 250 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचाही या मूर्तीवर काही परिणाम होणार नाही. पावसाळा आणि सूर्यप्रकाश यांपासून या मूर्तीचे रक्षण करण्यासाठी यावर कॉपरचा थर चढवण्यात येणार आहे, ज्याला 20 वर्षे काही होणार नाही. या मूर्तीची निर्मिती मिराज ग्रुप करत आहे आणि नरेश कुमावत या मूर्तीचे मूर्तिकार आहेत.

भगवान शिवच्या हातातील त्रिशूळ हे 315 फूट उंच आहे. मुर्तीमध्ये चार लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. 280 फूटापर्यंत पर्यटक जाऊ शकतील अशी सोय करण्यात आली आहे. सध्या जगातील सर्वात उंच शिव मूर्ती नेपाळच्या कैलाशनाथ मंदिरामध्ये आहे, याची उंची 143 फूट आहे.

जगातील सर्वात उंच शिव मूर्ती –

143 फूट – कैलाशनाथ मंदिर नेपाळ

123 फूट – मुरुदेश्वर मंदिर, कर्नाटक

112 फूट – आदियोग मंदिर, तामिळनाडू

108 फूट – मंगल महादेव, मॉरिशस