तामिळनाडू: मालिका अभिनेत्रीशी प्रेम संबध ठेवणे एका तरुणाला पडले महागात
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

छोट्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना तमिळनाडू (Tamilnadu) येथील कोलाथूर (Kolathur) येथे रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अभिनेत्रीसह तिचा पती, बहीण आणि मेहुण्याला अटक केली आहे. मुख्य आरोपी ही ज्या ठिकाणी काम करीत होती. तेथील एका फिल्म टेक्निशियन तरुणाशी तिची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम संबंध जुळले. यातून हा प्रकार घडल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले.

रवि असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून चेन्नई येथे तो फिल्म टेक्नेशिअन म्हणून काम करत होता. त्याठिकाणी देवी नावाची महिला मालिका कलाकार म्हणून काम करत होती. दोन वर्षापूर्वी रवी आणि देवी दोघांची ओळख झाली. यातून दोघांत प्रेमसंबंध जुळले. याची माहिती देवीचा पती शंकर याला कळाले. त्यावेळी शंकरने देवीला मालिकेतील काम बंद करण्याचा सल्ला दिला आणि शिलाई मशीन दुकान सुरू करुन दिले. मात्र, रविवारी रवी याने देवीचा शोध घेत तिची बहिण लक्ष्मी हिच्या घरी गेला. तसेच देवीला आणि आम्हाला पुन्हा एकत्र आणण्याची मागणी केली. त्यावेळी लक्ष्मीने आपली बहिण देवी आणि तिचा पती शंकर दोघांना फोन करुन तिच्या घरी बोलावले. दरम्यान, देवीला पाहिल्यानंतरही रविने एकत्र येण्याची मागणी सुरुच ठेवली. यातून देवि हिने रविच्या डोक्यात लोखंडी दांड्याचा फटका मारला. यात रवि जमीनीवर कोसळला. त्यावेळी त्याच्या डोक्यातून खूप रक्त वाहू लागले. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर देवी हिने जवळच्या पोलिस स्थानकात जाऊन खूनाची कबूली दिली. हे देखील वाचा- धक्कादायक! जेवणात मटन वाढले नाही म्हणून पतीकडून पत्नीची जाळून हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, देवीने पोलिस स्थानकात दिलेल्या कबूलीनंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी रविला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.