Rajastan Car Accident: राजस्थान येथे रॉंग वेवने चालवत असलेल्या कारचा भीषण अपघात, चार जण ठार, एक जण गंभीर,

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.

Accident (PC - File Photo)

Rajastan Car Accident: राजस्थानमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. राज्यातील डुंगरपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्ग 48  वर चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची एका खासगी बसला धडक बसली.या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीसांना धाव घेत अपघाताची नोंद घेतली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून जाणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाला. बसच्या आणि कारच्या धडकेत हा अपघात घडून आला. या घटनेत कारला जोरदार धडक लागल्याने कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तात्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी जखमी प्रवासांला रुग्णालयात नेले. तसेच अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

बिछवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीत चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची खजुरी नाळ येथे गुजरातहून डुंगरपूरकडे जाणाऱ्या खासगी बसला धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की समोरून कारचे पूर्ण नुकसान झाले. सतीश भाई (25), अंकित निनामा (25), रवी (23) आणि कौशिक (21) अशी मृतांची नावे आहेत. अपघाती कार ही गुजरात येथील असल्याची माहिती मिळली आहे.



संबंधित बातम्या

Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील