Uttar Pradesh Shocker: चॉकलेटचे आमिष दाखवून 4 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, आरोपीला अटक
पोलिसांनी या प्रकरणी १४ वर्षीय आरोपीला अटक केले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गागलहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतीली ही घटना आहे.
Uttar Pradesh Shocker: एका अल्पवयीन मुलाने 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी 14 वर्षीय आरोपीला अटक केले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गागलहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतीली ही घटना आहे. चॉकलेट देऊन एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील आहे. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. (हेही वाचा- तलावात आढळले तीन मुलांचे मृतदेह, हत्या झाल्याचा संशय, देवघर येथील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घरा बाहेर खेळत होती. त्यावेळीस आरोपीने संधी साधून तिला टॉफी दिल. आणि तिथून तीला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिस अधिकारी सागर जैन यांनी सांगितले. मुलगी एका निर्जन ठिकाणी बेशुध्द अवस्थेत कुटुंबियांना सापडली. ते घाबरून गेले. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु झाले. डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगतिले.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी पथक नेमले. आरोपाल पकडण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी हा शेजारीच राहायचा. त्याने मुलीवर नजर ठेवून मुलीवर बलात्कार ेकला.एकीकडे देशभरात कोलकत्ता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे.