Wayanad Landslide: केरळमधील वायनाड येथे भूस्खलनात 6 ठार, अनेक अडकल्याची भिती
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पुष्टी केली आहे की सर्व सरकारी संस्था शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.
Wayanad Landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात आज पहाटे भूस्खलन (Wayanad Landslide)झाले. भूस्खलनात किमान सहा जण ठार झाले. या घटनेत शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन(Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी पुष्टी केली आहे की, 'सर्व सरकारी संस्था शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. ऑपरेशन्समध्ये समन्वय साधला जाईल. बचाव कार्याचे नेतृत्व करण्यासाठी राज्यमंत्री डोंगराळ जिल्ह्यात पोहोचतील, असे मुख्यमंत्री विजयन यांनी त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.' (हेही वाचा:Papua New Guinea landslide: पापुआ न्यू गिनी भूस्खलनात 2,000 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे संयुक्त राष्ट्रांना मदतीच्या मागणीचे पत्र )
ते पुढे म्हणाले की, वायनाड जिल्ह्यात भूस्खलन आणि पावसाशी संबंधित इतर आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभागाने एक नियंत्रण कक्ष उघडला आहे. ज्यांना आपत्कालीन मदतीची गरज आहे त्यांना या दोन क्रमांकांद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. (हेही वाचा:Nepal Landslide Bus Accident: नेपाळमध्ये भूस्खलन झालेल्या बस दुर्घटनेत आतापर्यंत 19 मृतदेह सापडले, बचावकार्य अद्यापही सुरु )
पोस्ट पहा
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) ने बाधित भागात अग्निशमन दल आणि एमडीआरएफ टीम्स तैनात केल्या आहेत. अतिरिक्त एमडीआरएफ टीम वायनाड येथे दाखल झाली आहे. त्याशिवय, बचाव कार्यात मदत करण्यासाठी कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन टीम्सही पाठवण्यात असल्याचे केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.