धक्कादायक! सहावीतील मुलीवर दोन वर्षे वारंवार बलात्कार; पिडीता गर्भवती
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

मध्ये प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) येथील बाणगंगा परिसरात, 13 वर्षाच्या मुलीवर सतत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी टीटी नगर पोलिसांनी (TT Nagar police) 45 वर्षीय व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. शिवराज यादव (Shivraj Yadav) असे या व्यक्तीचे नाव असून, गेली दोन वर्षे तो या मुलीवर बलात्कार करत आहे. सततच्या बलात्काराने जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हा तिच्या कुटुंबियांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराजचा या मुलीच्या घराशेजारी शेंगदाणे विकण्याचा व्यवसाय आहे. शेंगदाण्याचे आमिष दाखवून, मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये शिवराजने या मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर धमकी देऊन हे कृत्य त्याने सुरूच ठेवले. अखेर यामुळे जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हा तिच्या कुटुंबाला ही गोष्ट समजली. (हेही वाचा: कफ परेड येथे 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपी फरार)

कुटुंबातील सदस्यांनी दखल केलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक गुन्हेगारी (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.