पश्चिम बंगाल: मंदिराची भिंत कोसळून ४ भाविकांचा मृत्यू तर, २७ जण जखमी
Aloknath Temple | (Photo Credits: ANI)

पश्चिम बंगाल (West Bengal) येथे मंदिराची भिंत कोसळून ४ भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २७ जण खजमी आहेत. ही घटना पश्चिम बंगाल येथील कचुआ परिसरात घडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarji) यांनी मृतांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचे घोषीत केले आहे.

कचुआ येथील परिसरात अलोकनाथाचे प्रसिद्ध मंदीर आहेत. दरवर्षी या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमा जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी त्या गर्दी केली होती. या दरम्यान आलोकनाथ मंदिराची भिंत कोसळली. त्यानंतर भाविकांमध्ये चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. भाविक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत होते. यातच 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 27 जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हे देखील वाचा- मुंबई मधील व्यावसायिक इमारतीमध्ये विकलागांच्या सोईसाठी उपाय करा- हायकोर्टाचा आदेश

ANI चे ट्विट पाहा-

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांना ५ लाख तर, जखमींना १ लाख रुपये देण्याचे घोषीत केले. रुग्णालयात दाखल केलेल्या भाविकांची अद्याप माहिती समोर आली नाही. तसेच या मंदिराची भिंत कशामुळे ढासळली, याची चौकशी केली जात आहे.