Bihar Shocker: पाटण्यात 17 वर्षीय विद्यार्थिनीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; कोचिंग क्लासला जाताना घडली घटना

अनामिका रोज तिच्या गावापासून मसौरीला कोचिंग क्लासला जात असे.

Gun Shot | Pixabay.com

Bihar Shocker: बिहार (Bihar) मध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये गेल्या दिवसांपासून वाढ होत आहे. लहान मुले आणि महिलांवरील गुन्ह्यांच्या अनेक घटना राज्यातून समोर येत आहेत. बिहारमधील पाटणा (Patna) येथे एका विद्यार्थिनीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. पाटणाजवळील मसौरी गावात काही अज्ञात हल्लेखोरांनी अल्पवयीन मुलीवर गोळ्या झाडल्या. यावेळी पीडित मुलगी कोचिंग क्लासला (Coaching Class) जात होती. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

वृत्तानुसार, आरोपींनी कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीला मसौरी येथील मनीचक मोडजवळ दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या. अनामिका असे मृत मुलीचे नाव असून ती नदवान चापौर काजीचक येथे राहणाऱ्या कमलेश कुमार यांची मुलगी आहे. अनामिका रोज तिच्या गावापासून मसौरीला कोचिंग क्लासला जात असे. (हेही वाचा - Bihar Crime News: हुंड्यासाठी महिलेला जिवंत जाळले, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल; बिहार येथील घटना)

दरम्यान, आरोपींनी पीडित तरुणीच्या डोक्यात गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर विद्यार्थिनीला उपविभागीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनीच्या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

तथापी, पोलीस परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून अल्पवयीन मुलीवर गोळी झाडलेल्या गोळीचे कवच जप्त केले आहे. घटनेची माहिती मिळताच मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी उपविभागीय रुग्णालयात धाव घेतली.



संबंधित बातम्या