Teen Assaulted in Delhi Metro: दिल्ली मेट्रोमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराच, एक्सवर शेअर केला अनुभव

एक्सवर त्याने त्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यावर आता दिल्ली पोलिसांनी प्रतिक्रिया देत. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Photo Credit -X

Teen Assaulted in Delhi Metro : सध्या मुलींसह मुलांवरही अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचं समोर यत आहेत. नुकतीच एक घटना दिल्लीत मेट्रो(Delhi Metro)मधून प्रवास करणाऱ्या एका मुलासोबत ( Teen Assaulted in Delhi Metro )घडली. भव्य असं पिडीत अल्पवयीन मुलाच नाव आहे. ३ मे रोजी राजीव चौक मेट्रो स्टेशनवर त्याच्या सोबत लैंगिक अत्याचाराचा प्रसंग घडला. त्यानंतर त्याने ही घटना ट्विट करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली. त्यावर आता दिल्ली पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.

एक्सवर भव्यने ही घटना शेअर केली. ज्यामध्ये तो या घटनेमुळे घाबरला असल्याचे त्याने म्हटले आहे. "माझ्यावर आत्ताच दिल्लीच्या मेट्रोमध्ये राजीव चौक मेट्रो स्टेशनवर हल्ला झाला. मी १६ वर्षांचा मुलगा आहे, आणि या घटनेवेळी मी मेट्रोमधून एकटाच प्रवास करत होतो. माझी मूळ पोस्ट Reddit वर होती आणि लोकांनी मला इथे पोस्ट करायला सांगितले आणि दिल्ली पोलिसांना टॅग कर असे सांगितले, म्हणून मी ही पोस्ट केली आहे,” असे त्याने एक्सवर पोल्ट करत म्हटले आहे.

सुदैवाने या घटनेवेळी मेट्रो स्टेशनवर गार्ड उपस्थित होते. त्यांनी नंतर भव्यला दुसऱ्या मेट्रोमध्ये सुरक्षितपणे बसवले. मात्र,या घटनेमुळे मी सुन्न झालो होतो आणि त्या व्यक्तीच्या थांबण्याची वाट पाहत होता. आरोपीने तीन वेळा हल्ला केला. तिसऱ्यांदा भव्यने "त्याचे केस पकडले आणि त्याचा फोटो काढला". भव्यने त्याच्यासोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला, पण काहीही झाले नाही".असे त्याने म्हटले आहे. पिडीत मुलाची ही पोस्ट 19,000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे.

भव्यच्या पोस्टवर एका युजरने प्रतिक्रीया व्यक्त करताना लिहिले की, "तुझ्या पालकांना याबाबत कळव आणि यावर कडक कृतीची गरज आहे."दुसऱ्या युजरने पोस्टवर प्रतिक्रीया व्यक्त करताना लिहिले की,"तू मुलगा आहेस? मी तुला मुलगी समजत होतो. दिल्लीत मुलेही अशा प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे जात आहेत. हे धक्कादायक आहे. कृपया सुरक्षित रहा आणि आवाज उठवल्याबद्दल तुझे स्वागत आहे." "हे लैंगिक छळाचे प्रकरण आहे आणि तेही अल्पवयीन मुलासोबत. कृपया गंभीर कारवाई करा," असे तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif