महाराष्ट्र: नुकत्याच जाहीर झालेल्या JEE Main परीक्षांच्या निकालामध्ये पुण्यातील Chirag Falor याने 12  वा क्रमांक मिळविला, तर अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्येही त्याला जागा मिळाली. जेईईपेक्षा एमआयटीची परीक्षा खूप सोपी असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.

पुणे शहरात आज नव्याने 2,120 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 1,24,568 इतकी झाली आहे. शहरात कोरोनाबाधितांची एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 17,662 झाली आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे 6,970 रुग्ण असून, होम आयसोलेशनमध्ये 10,702 रुग्ण उपचार घेत आहेत.

कर्नाटक पोलिसांनी आज हुबळीजवळील कुसुगल गावात एका शेतात 18.4 किलो गांजा रोपे जप्त केली आहेत याच प्रकरणार एका आरोपीला अटक. करण्यात आली आहे या आरोपी वर  एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

तामिळनाडु मधील कोविलपट्टी भागात 28 मोरांंचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळुन आल्याची घटना समोर येत आहे. या मृत्युचे कारण अभ्यासण्यासाठी तपास सुरु आहे.

रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, बीड, परभणी, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, धुळे या जिल्ह्यात पुढील 3 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.

नागपुर मध्ये वाढत्या कोरोनामुळे या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी 18 सप्टेंबर रात्री 9.30 ते सोमवार 21 सप्टेंबर सकाळी 7.30 पर्यंत कडकडीत बंंद पाळला जाणार आहे.

कोरोना व्हायरस संकटात रुग्णांंवर उपचार करताना मृत्यु झालेल्या रुग्णांंचा रेकॉर्ड केंद्र सरकारने नीट ठेवला नसल्याचे म्हणत आयसीएमआर ने टीका केली आहे. या डॉक्टरांंना शहीद म्हणुन संबोधले जावे अशी ही मागणी आयसीएमआर कडून करण्यात आली आहे.

केंद्रीय मंंत्री नितीन गडकरी यांंना कोरोनाची लागण झाली असुन याविषयी त्यांंनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे उद्या राज्यसभेत पूर्व लडाखमधील भारतीय सीमेवर नुकत्याच झालेल्या घडामोडींबाबत निवेदन करणार आहेत.

पुणे शहरात आजच्या दिवसभरात नवे 2,120 कोरोनाबाधित आढळुन आले असुन आज नव्या 43 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यानुसार एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 1,24,568 इतकी झाली आहे तर आजवरच्या मृतांंचा आकडा 2,918 इतका आहे.  

Load More

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. मराठा समाजातील नाराजी देखील वाढत आहे. तसंच महाविद्यालय, विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने कराव्या लागणार आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलं आहे. दरम्यान, यातून मार्ग काढण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री साडेआठ वाजता चर्चा होणार आहे.

कोरोना व्हायरसचे जागतिक आरोग्य संकट देशावर घोंगावत आहे. अलिकडच्या काळात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. देशासह राज्यातील वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कालपासून राज्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान कोविड-19 वरील लस 2021 च्या पहिल्या तिमाईत उपलब्ध होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

अनलॉकचा चौथा टप्पा देशभरात सुरु असून त्या अंतर्गत विविध सेवा-सुविधा नागरिकांसाठी पुन्हा सुरु केल्या जात आहेत. 14 सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये जीम पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. विशेष खबरदारी घेत या सेवा नागरिकांसाठी खुल्या केल्या आहेत.