अजय फणसेकर दिग्दर्शित सिनियर सिटीझन या सिनेमाचा नुकताच फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमातून अभिनेते मोहन जोशी हे मराठी सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहेत. ते मुख्य भूमिका साकारताना दिसतील.
ओम क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर राजू सावला क्रिएटिव्ह प्रोड्यूसर व प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते असणार आहेत.
पहा सिनेमाचा पोस्टर
मोहन जोशी यांचा चित्रपटही लुक खूपच दमदार असणार आहे. चित्रपटाचं कथानक काय हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं असलं तरी पोस्टरवरून आपल्याला कल्पना येते की वयस्कर आणि तरुण वर्गातील मुलांमधील विचारांवर हा सिनेमा आधारित असेल.
अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका बजावताना दिसणार आहेत.
'रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी "एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन अजय फणसेकर यांनी या आधी केलं आहे. आता त्यांची नवीन कलाकृती लोकांना कितपत पसंत पडते हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.