Zee Marathi Awards 2019: ‘झी मराठी अवॉर्ड्स’मध्ये ‘अग्गंबाई सासूबाई’चे घवघवीत यश; पटकावले तब्बल 9 पुरस्कार, पहा यादी
तेजश्री प्रधान आणि निवेदिता जोशी (Photo Credit : Zee Marathi)

झी मराठीचे (Zee Marathi) कलाकार, तंत्रज्ञ आणि मालिका यांच्या कलागुणांना व लोकप्रियतेला वाव देणारा पुरस्कार सोहळा म्हणजे, ‘झी मराठी अवॉर्ड्स’ (Zee Marathi Awards). हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. यामध्ये मालिका व भूमिकेंच्या विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी या पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘अग्गंबाई सासूबाई’ ‪(Aggabai Sasubai‬) या मालिकेने आपली छाप उमटवली आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये  ‘अग्गंबाई सासूबाई’ने तब्बल 9 पुरस्कार पटकावले आहे. मागच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘तुला पाहते रे’ मालिकेचा बोलबाला होता.

तीन महिन्यांपूर्वी ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सुरु झाली. तेजश्री प्रधान आणि निवेदिता जोशी अशा लोकप्रिय कलाकारांनी या मालिकेतून पुनरागमन केले. बघता बघता या सासू सुनांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली. प्रेक्षकांनी कौल देत या मालिकेने 9 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावले आहेत.

‘अग्गंबाई सासूबाई’ला मिळालेले पुरस्कार- सर्वोत्कृष्ट सासू, सर्वोत्कृष्ट सून, -सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री)- मॅडी, सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आई

त्यानंतर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेची वर्णी लागते. रात्रीस खेळ चालेने 6 पुरस्कार पटकावले आहेत, (हेही वाचा: झी मराठी ची नवी मालिका, ‘अग्गंबाई सासूबाई’; तेजश्री प्रधान आणि निवेदिता जोशी उलगडणार सासू सुनेचे नवे नाते (Video))

‘रात्रीस खेळ चाले’ला मिळालेले पुरस्कार - सर्वोत्कृष्ट खलनायिका- वच्छी, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (स्त्री)- शेवंता, सर्वोत्कृष्ट खलनायक- अण्णा नाईक, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष)- अण्णा नाईक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री)- छाया, सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष)- चोंट्या

महत्वाचे म्हणजे सध्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘तुझ्यात जीव रंगला’, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिका टीआरपीमध्ये अव्वल असलेल्या दिसून येत आहे. या मालिकांना मागे टाकून ‘अग्गंबाई सासूबाई’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.