Mouni Roy Bengali Wedding: दुसऱ्यांदा नवरी बनली मौनी रॉय; बंगाली पद्धतीने पार पडला विवाहसोहळा (See Photo and Video)

दोघेही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी तिथे पोहोचले होते. दोघे अनोळखी म्हणून भेटले व दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. यानंतर सूरज आणि मौनी एकमेकांना पसंत करू लागले

Mouni Roy Bengali Wedding (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि सूरज नांबियार यांनी 27 जानेवारी रोजी सकाळी गोव्यात दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न केले. यानंतर गुरुवारी सायंकाळी उशिरा मौनी रॉय दुसऱ्यांदा नवरी झाली. यावेळी ती बंगाली वधूच्या (Mouni Roy Bengali Wedding) वेशात दिसून आली. आज संध्याकाळी मौनी आणि सूरज नांबियार यांनी बंगाली रितीरिवाजानुसार सात फेरे घेतले आहेत. म्हणजेच या जोडप्याने एका दिवसात दोनदा लग्न केले. एक मल्याळी परंपरेनुसार आणि दुसरी बंगाली प्रथेनुसार. मीत ब्रदर्सपैकी मनमीत सिंग मौनीच्या लग्नासाठी उपस्थित होता, ज्याने तिच्या मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले.

मौनी रॉयच्या बंगाली लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहत. लाल रंगाचा लेहेंगा आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. डोक्यावर गोटा वर्कचा दुपट्टा तसेच तिने कुंदनचे संपूर्ण दागिने परिधान केले आहेत. ब्राइडल मेकअप तर खूपच छान झाला आहे. सूरज नांबियार गोल्डन कलरच्या शेरवानीमध्ये दिसत आहे. सूरज नांबियार हा दक्षिण भारतीय आहे, तर मौनी रॉय बंगालची आहे, त्यामुळे या जोडप्याने दोनदा लग्न केले.

मनमीतने सांगितले की, आज पारंपारिक स्टाईलमधील लग्नानंतर उद्या रिसेप्शन आणि कॉकटेल पार्टी ठेवली आहे. यामध्ये मौनीचे सर्व जवळचे लोक परफॉर्म करणार आहेत. राहुल शेट्टीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Movie Talkies (@movietalkies)

 

View this post on Instagram

 

A post shared by FilmyKalakar (@filmykalakar)

दरम्यान, सूरज आणि मौनीची पहिली भेट डिसेंबर 2019 मध्ये दुबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली होती. दोघेही नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी तिथे पोहोचले होते. दोघे अनोळखी म्हणून भेटले व दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. यानंतर सूरज आणि मौनी एकमेकांना पसंत करू लागले आणि डेटिंग सुरु झाली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif