'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील सोहम नेमका आहे तरी कोण?
Ashutosh Patki (Photo Credits: Instagram)

टीव्ही मालिकांना लोकांनी कितीही नावं ठेवली तरी त्यावाचून काही आपल्याला करमत नाही. अनेक मालिका येतात, प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात आणि नंतर निरोपही. त्यानंतर नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतात. अशीच एक नवीकोरी मालिका झी मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. 'अग्गंबाई सासूबाई' ही नव्याने दाखल झालेली मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा एकदा मालिकांकडे वळली आहे. मात्र मालिकेत सोहमच्या रुपात नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (24 जून पासून सुरु होणार 'Mrs.मुख्यमंत्री' ही मालिका)

हा सोहम नेमका आहे तरी कोण?

अभिनेता आशुतोष पत्की हा सोहम कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. यापूर्वी तो 'वन्स मोअर' या सिनेमातही झळकला होता. हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केल्यानंतर आशुतोषने अभिनयाकडे आपला प्रवास वळवला. त्यासाठी त्याने अनुपम खेर अॅकॅडमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं. यापूर्वी तो 'मेंदीच्या पानावर' आणि 'दुर्वा' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

View this post on Instagram

 

Kasa vatla episode??? #agabaisasubai #zeemarathi

A post shared by 𝐀𝐬𝐡𝐮𝐭𝐨𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐤𝐢 (@ashutoshpatki) on

 

View this post on Instagram

 

Aai ani babadya 😋🥰🥰 #agabaisasubai #mummasboy #zeemarathi

A post shared by 𝐀𝐬𝐡𝐮𝐭𝐨𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐤𝐢 (@ashutoshpatki) on

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेचा विषय वेगळ्या धाटणीचा असून यात गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यात आपल्याला तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की म्हणजेच शुभ्रा-सोहमची नवी जोडी पाहायला मिळत आहे. सुरुवातीलाच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र नंतर मालिका कोणते वळण घेणार आणि मालिकेत नेमके काय काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.