लग्नानंतर Ankita Lokhande झाली कोट्यावधींची मालकीण; पती Vicky Jain ने भेट दिला मालदीवमध्ये 50 कोटींचा व्हिला
अंकिता लोखंडे, विकी जैन (Photo Credit : Instagram)

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाह 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात झाला. लग्नानंतर दोघांनी ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये अंकिता आणि विकीचे सर्व मित्र सामील झाले होते. या जोडप्याचे लग्न किती थाटामाटात झाले, याचा अंदाज त्यांच्या लग्नाच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरून लावता येतो. अंकिता आणि विकी 2018 पासून एकमेकांना ओळखतात. आता माहिती मिळत आहे की, लग्नानंतर अंकिता कोट्यावधींची मालकीण झाली आहे, कारण विकीने पत्नी अंकिताला मालदीवमध्ये एक आलिशान व्हिला भेट दिला आहे.

अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले असून, सांगितले जात आहे की या व्हिलाची किंमत 50 कोटीहून अधिक आहे. यासोबतच अंकिताने विकीसाठी एक प्रायव्हेट यॉट खरेदी केली आहे, ज्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. अंकिता आणि विकीच्या मित्रांनीही त्यांना अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. एकता कपूरने अंकिताला 50 लाखांचा डायमंड सेट भेट दिला आहे. माही विजने सब्यसाची कलेक्शनमधून 15 लाखांची साडी भेट दिली आहे. (हेही वाचा: Ankita Lokhande Mehendi Pics: अंकिता लोखंडे च्या लगीनघाईला सुरूवात; मेहेंदी सोहळ्यातील फोटोज वायरल)

रित्विक धनजानीने विकी जैनला एक महागडे घड्याळ आणि अंकिता लोखंडेला डायमंड चोकर भेट दिली आहे, त्याची किंमत 15 लाख रुपये आहे. टायगर श्रॉफने अंकिता लोखंडेला 'मिनी कूपर' ब्रँडची कार दिली आहे. अभिनेत्री सृष्टी रोडे हिने अंकिता लोखंडेला सोन्याची चेन भेट दिली आहे. विकी जैन हा एक मोठा व्यावसायिक आहे. अंकिता आणि विकीने 2018 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. आता अखेर दोघांनी त्यांच्या नात्याचे लग्नात रुपांतर केले. दोघेही त्यांच्या लग्नाच्या सर्व फंक्शनमध्ये खूप उत्साही दिसत होते.