Bigg Boss Marathi 2, Episode 98 Preview: बिग बॉसच्या घरात सकाळी लावलेल्या गाण्यामुळे सदस्यांच्या आठवणीला मिळणार उजाळा, सुरेखा पुणेकर लावणीवर थिरकताना दिसणार

तत्पूर्वी शुक्रवारच्या एपिसोडमध्ये घरातून बाहेर पडलेले सदस्य पुन्हा एकदा बीबी हाउस मध्ये दाखल झाले आहेत. या सर्वांच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण झाले आहे.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉस 2 चे पर्व संपण्यासाठी आता फक्त काही तासच उरले आहेत. तत्पूर्वी शुक्रवारच्या एपिसोडमध्ये घरातून बाहेर पडलेले सदस्य पुन्हा एकदा बीबी हाउस मध्ये दाखल झाले आहेत. या सर्वांच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण झाले आहे. तसेच जुन्या सदस्यांना पुन्हा बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळाली आहे. तर आजच्या भागात सदस्यांची पहाट ही बिग बॉस नेहमीप्रमाणे लावत असलेल्या गाण्याने होते. 90's मधील गाणे 'अजीब दास्ता हे '  गाणे वाजताच सर्व सदस्य जागे होतात. या गाण्याचा अर्थ खरच हृदयस्पर्शी असला तरीही सदस्यांना त्यांच्या घरातील जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

तसेच वैशाली माडे हिच्या बहारदार गाण्यावर सुरेखा पुणेकर थिरकताना दिसून येताना दिसून येणार आहेत. बिग बॉसच्या घरात सध्या अवॉर्ड सेरेमनी सुरु असून कोणाला कोणता अवॉर्ड मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कालच्या एपिसोडमध्ये सुद्धा आरोह वेलणकर अवॉर्ड सेरेमनीचे सुत्रसंचालन करताना दिसून आला. (Bigg Boss Marathi 2, August 30, Episode 97 Update: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच सर्व सदस्य एकत्र; रंगला अनोखा पुरस्कार सोहळा)

Colors Marathi Tweet:

शुक्रवारच्या एपिसोडमध्ये पहिला पुरस्कार असतो, सर्वोत्कृष्ट ‘आता माझी सटकली’ पुरस्कार. यामध्ये शिवानी, नेहा आणि बिचुकले यांना नामांकने मिळतात. सर्वानुमते हा पुरस्कार बिचुकले यांना देण्यात येतो, जो शिवानी त्यांना प्रदान करते.त्यानंतर घोषणा होते सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार – यामध्ये बाप्पा-सुरेखा, शिव-वीणा, नेहा-शिवानी, हीना-बिचुकले, बिचुकले-शिवानी यांना नामांकने मिळतात. पुरस्कार मिळतो तो वीणा आणि शिव यांना. अभिजित आणि वैशाली तो त्यांना प्रदान करतात.