Manjusha Niyogi Committed Suicide: बंगाली मॉडेल मंजुषा नियोगीने गळफास लावून संपवली जीवनयात्रा; कोलकत्यात 2 आठवड्यात तिसरी घटना
Manjusha Niyogi (PC - Instagram)

Manjusha Niyogi Committed Suicide: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील पाटुली भागात राहत्या घरी आणखी एक मॉडेल मृतावस्थेत आढळून आली. तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पश्चिम बंगालमध्ये, एका मॉडेलने कोलकाता येथील पाटुली भागात तिच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजुषा नियोगी (Manjusha Niyogi) असे मृत मॉडेलचे नाव आहे.

तिच्या आईचा दावा आहे की, दोन दिवसांपूर्वी तिची मैत्रीण आणि दुसरी मॉडेल बिदिशा डी मजुमदारच्या मृत्यूनंतर ती खूप नैराश्यात होती. ब्राइडल मेकअप फोटोशूटसाठी मजुमदार हा एक प्रसिद्ध चेहरा होता. बुधवारी संध्याकाळी त्यांनी दुमदुम परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. (हेही वाचा - Actress Bidisha De Majumdar Dead: 21 वर्षीय बंगाली अभिनेत्रीची आत्महत्या, घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त)

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी नियोगी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. नियोगीच्या आईने सांगितले की, "माझी मुलगी तिची मैत्रिण बिदिशाच्या मृत्यूनंतर खूप नैराश्यात होती आणि तिच्याबद्दल सतत बोलत होती."

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मंजुषाचे पालक जेव्हा अभिनेत्रीला फोन करत होते तेव्हा ती कोणाच्याही फोनला उत्तर देत नव्हती. त्यानंतर मंजुषाला पाहण्यासाठी खोलीत गेले असता, तेथे अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रसिद्ध टीव्ही मालिका अभिनेत्री Pallabi Dey नुकतीच दक्षिण कोलकाता येथील गरफा भागात तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडली होती.