'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेमध्ये येणार ट्विस्ट; अभिजीत राजे हटके अंदाजात घालणार आसावरीला लग्नाची मागणी, Watch Video

हा क्षण या मालिकेच्या प्रत्येक चाहत्यासाठी खूपच स्पेशल आणि उत्सुकता वाढवणारा असेल.

Aggbai Sasubai Serial (Photo Credits: Instagram)

झी मराठीवरील (Zee Marathi) सध्या बहुचर्चित असलेली आणि लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'अग्गंबाई सासूबाई' (Aggobai Sasubai) सध्या खूपच रंजक वळणावर आली आहे. या मालिकेने काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेमधील अभिजीत राजे (Abhijeet Raje) आणि आसावरी (Asavari) यांचे गुलाबी प्रेम प्रेक्षकांना आवडत असून ब-याच जणांना ही मालिका आपल्या जवळची वाटू लागली आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती कधी या दोघांचे प्रेम जुळून येईल आणि कधी अभिजीत राजे आसावरी ला प्रपोज करतील. पण लवकरच प्रेक्षकांना हवीहवीशी वाटणारी गोष्टा या मालिकेत घडणार आहे.

कळत-नकळतपणे अभिजीत आसावरी पुढे आपल्या प्रेमाची कबुली देणार असून तिला लग्नाची मागणी घालणार आहे. हा क्षण या मालिकेच्या प्रत्येक चाहत्यासाठी खूपच स्पेशल आणि उत्सुकता वाढवणारा असेल.

पाहूयात या गुलाबी क्षणाची एक झलक:

 

View this post on Instagram

 

अभिजीतचं स्वप्न म्हणजे आसावरीची जन्मोजन्मीची साथ, प्रेमाने पुढे केलेल्या हातात आसावरी देईल का हात...? #AggabaiSasubai #zeemarathi @tejashripradhan @g_oak1985 @nivedita_ashok_saraf

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

हेदेखील वाचा- अग्गंबाई..सासूबाई या मालिकेमधील मधील 'मॅडी' आहे हिंदी आणि मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची बायको

या मागणीनंतर आसावरीची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आसावरी अभिजीत राजेंना होकार देणार की यामुळे ती त्यांच्यासोबत असलेली मैत्री कायमची तोडणार हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरणार आहे.

अग्गंबाई सासूबाई या मालिकेमधील इतर पात्रे शुभ्रा, सोहम, आबा हे देखील या कार्यक्रमाची रंगत वाढवत आहेत. तर दुसरीकडे मॅडी चा बालिशपणा आणि प्रज्ञाची कटकारस्थाने देखील मालिकेत बरीच ट्विस्ट आणत आहेत.