Photo Credit - Instgram

महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्याची मौल्यवान देणगी लाभली आहे. डोंगर माथ्यांनी नटलेल्या भूमीत अनेक संत, महात्मे, शूर-वीर होवून गेले. महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. शेकडो वीरांच्या शौर्याची साक्ष मातीचा कण आणि कण देत आहे. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. अशाच शूरवीराच्या गाथेला उजाळा देण्यास जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, निर्माते गौतम मुथा निर्मित आणि दिग्दर्शक दिपक कदम (Deepak Kadam) दिग्दर्शित, 'सरनोबत' (Sarnobat) अर्थात वेडात मराठे वीर दौडले सात, हा भव्यदिव्य चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मराठीसह हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक दिपक कदम यांनी सरनोबत चित्रपटातून वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते त्या शूर सेनाण्यांचा म्हणजेच प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी शिंदे यांचा पराक्रम हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी दिपक कदम यांनी 'पुरषा', 'ऍट्रोसिटी', 'एका लग्नाची गोष्ट', 'नगरसेवक एक नायक', 'वाक्या', 'गोल माल प्रेमाचा', 'संसाराची माया' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यांनी अनेक मालिकांचेही दिग्दर्शन केले असून 'पुरषा' हा वेगळ्या धाटणीचा अवॉर्ड विनिग चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे लवकरच दिपक हिंदी भाषिक ऐतिहासिक 'सरनोबत' हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Kadam (@deepak_kadamdirector)

या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक दिपक कदम बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाले आहेत. जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, निर्माते गौतम मुथा निर्मित आणि दिग्दर्शक दिपक कदम दिग्दर्शित,या चित्रपटाला देव - सुचिर यांनी संगीत दिले असून, एस. के. वल्ली यांनी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात या चित्रपटाची भव्यदिव्यता चित्रित केली आहे. चित्रपटाची संकल्पना संजय कसबेकर, दिपक कदम यांची असून चित्रपटाची कथा अभिजित कुलकर्णी लिखित आहे. चित्रपटाच्या व्हिएफएक्सची जबाबदारी ऍनिमेक डिझाइन आणि राहुल बाबासाहेब साळुंखे यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर म्हणून विनोद कुमार बरई यांनी तर Ep म्हणून राजेंद्र सावंत यांनी बाजू सांभाळली आहे. (हे देखील  वाचा: Dharmaveer: बाहुबलीच्या दिग्दर्शकाला मराठमोळ्या धर्मवीरची भुरळ !)

याबाबत बोलताना चित्रपाटाचे दिग्दर्शक दिपक कदम असे म्हणाले की, 'सरनोबत' म्हणजेच प्रतापराव गुजर, आपण लहानपणापासून एक गाणं ऐकतोय, म्यांनातून उसळे तलवारीची पात। वेडात मराठे वीर दौडले सात, पण हे सात मराठा वीर कोण आणि ते का दौडले आणि त्यांचे पुढे काय झाले याचा मागोवा घेणारी ही फिल्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा धैर्यशील माणसांची फौज तयार केली होती जी माणसे स्वराज्यासाठी आपली प्राणाची आहुती द्यायला तत्पर असत, केवढी ही स्वामी निष्ठा आणि केवढे ते स्वराज्य प्रेम, अश्या स्वराज प्रेमाने बेभान झालेले त्यातलेच एक प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शिलेदार यांच्या पराक्रमाची गाथा म्हणजेच वेडात मराठे वीर दौडले सात अर्थात सरनोबत