अभिनेत्री सनी लिओनी हिचा हा Prank Plan चा व्हिडिओ पाहिलात का? (Video Viral)
Sunny Leone (Photo Credits- Twitter)

बॉलिवूड मध्ये सध्या आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांना घायाळ करणारी सनी लिओनी (Sunny Leone) सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात सनी हिने नुकताच एक प्रँक प्लान (Prank Plan) बनवला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच आतापर्यंत 15 लाख नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

सनी लिओनी तिच्या शूटिंगदरम्यान सेटवर प्रँक प्लान बनवते. काही वेळा ते यशस्वी ठरतात. मात्र नुकताच सनी हिने एका चित्रपटाच्या शूटिंग सेटवर प्रँक प्लान बनवला होता. त्यामध्ये ती स्विमिंगपुल जवळ इतर सहकाऱ्यांसोबत गाण्यावर नाचताना दिसली. सुरुवातीला हे सर्वजण नाचत आहे असे वाटते. परंतु सनी मध्येच एका सहकाऱ्याला धक्का मारत त्याला स्विमिंगपुल मध्ये ढकलते. मात्र सनीच्या नकळत तिच्या मागे उभा असलेला सहकारी खुद्द सनीलाच स्विमिंग पुलमध्ये ढकलून देतो. यामुळे सनी लिओनी हिने दुसऱ्यांसाठी तयार केलेला प्रँक प्लान तिच्यावरच उलटला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ तिने नुकताच इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. हेही वाचा-XXX स्टार मिया खलिफा हिचा अंडरगार्मेंटसमधील सेक्सी व्हिडिओ व्हायरल, एकट्यातच पाहा (Video)

 

View this post on Instagram

 

Lunch time!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लिओनी सध्या चित्रपट 'रंगीला' मधून मल्याळम सिनेमासाठी डेब्यू करणार आहे. संतोष नायर दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सनी सध्या गोव्यात दाखल झाली आहे. त्यावेळी तिने हा प्रँक प्लान केला होता आणि स्वत:च फसली आहे. या चित्रपटातून सनीसह सूरज वेंजरामूडु, सलीम कुमार आणि अजू वर्गीस झळकणार आहेत.