Sidhu Musewala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पहिली अटक, आरोपींला 5 दिवसांची पोलीस कोठडी
Sidhu Moose Wala (Photo Credit - Social Media)

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी (Sidhu Musewala Murder Case) पहिली अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) मनप्रीत सिंह नावाच्या व्यक्तीला उत्तराखंडमधून (Uttarakhand) अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी सोमवारी डेहराडूनमधून पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे पाच जण उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील हेमकुंड साहिब गुरुद्वाराकडे जात होते. या पाच जणांना येथील शिमला बायपास रोडवरून ताब्यात घेऊन चौकशीसाठी पंजाबला नेण्यात आले. गायकाच्या हत्येमध्ये त्यांची भूमिका काय होती हे आता पंजाब पोलिस शोधून काढतील, असे ते म्हणाले.

सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटवर फिरोजपूर तुरुंगातून दोघांना ताब्यात घेतले आहे. पंजाब पोलिसांनी मनप्रीत सिंह नावाच्या व्यक्तीला अटक करून न्यायालयात हजर केले. तेथून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मनप्रीत सिंहने मारेकऱ्यांना कार पुरवली होती. (हे देखील वाचा: लॉरेन्स बिश्नोई कोण आहे? ज्याच्या टोळीने दिवसाढवळ्या केली Sidhu Moose Wala ची हत्या; सलमान खानलाही दिली होती जीवे मारण्याची धमकी)

रविवारी झाला खून

विशेष म्हणजे पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मुसेवाला (27) हे देखील काँग्रेसचे नेते होते. आज त्यांच्या मूळ गावी मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. सिद्धू मुसेवाला कॅनडात शिकण्यासाठी गेले होते, त्यानंतर पंजाबला परतल्यावर ते गायक म्हणून परतले. सिद्धू मुसेवाला हे अनेक वादांशीही जोडले गेले होते. पंजाब सरकारने सिद्धू मूसवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली.