सूर हरपले! ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन

सन १९२६ मध्ये १ नोव्हेंबर या दिवशी यशवंत देव यांचा जन्म झाला. संगीत त्यांच्या घरातच होते. वडिलांकडून लहानपणीच त्यांना संगीताचे धडे मिळेले. संगीत विश्वात त्यांचे वडीलच त्यांचे पहिले गुरु होते.

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन ((Photo credit: YouTube)

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’यांसारख्या एकापेक्षा एक अशा शेकडो दर्जेदार गीतांनी रसिक श्रोत्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ संगितकार यशवंत देव यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गेले प्रदीर्घ काळ ते आजारी होते. त्यांच्यावर दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (मंगळवार, ३० ऑक्टोंबर) सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान, यशवंत देव हे उत्कृष्ट संगीतकार होतेच. पण, ते तितकेच चांगले गीतकारही होते. अनेक गाण्यांना त्यांनी संगीतसाज चढवला. अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीत यांसारखे एक ना अनेक गीत प्रकार त्यांनी संगितबद्ध केले. गेले काही दिवस त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे केलेल्या तपासणीत त्यांना चिकनगुनियाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही आजारांवर मात करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला यश मिळू शकले नाही. संगीतकार यशवंत देव यांना देवेंद्र फडणवीसांची श्रद्धांजली

सन १९२६ मध्ये १ नोव्हेंबर या दिवशी यशवंत देव यांचा जन्म झाला. संगीत त्यांच्या घरातच होते. वडिलांकडून लहानपणीच त्यांना संगीताचे धडे मिळेले. संगीत विश्वात त्यांचे वडीलच त्यांचे पहिले गुरु होते. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच आपण सुगम संगिताकडे वळल्याची आठवण देव नेहमी सांगत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Makar Sankranti 2025: Akshay Kumar आणि Paresh Rawal यांनी उडवली पतंग; 'भूत बांगला' चित्रपटाच्या सेटवर मकर संक्रांत साजरी (Watch Video)

‘Sadhvi’ Offered Lead Role in ‘Deshdrohi 2’ by KRK: महाकुंभात आलेल्या सुंदर साध्वीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला केआरकेने दिली देशद्रोही 2 चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर

Sachin Pilgaonkar आणि Supriya Pilgaonkar यांच्या नावे फसवणूक; मॅनेजर असल्याचे सांगून कामाच्या बदल्यात पैशांची मागणी

Pritam Pedro: राजकुमार हिरानी यांच्या 'प्रीतम पेड्रो' वेब सिरीजमध्ये विक्रांत मेस्सी दिसणार खलनायकाच्या भूमिकेत, अर्शद वारसी मुख्य भूमिकेत

Share Now