Sai Tamhankar 33 rd Birthday: मराठी टेलिव्हिजनवरून करियरची सुरूवात करणार्या सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) आज इंटरनॅशनल फिल्मपर्यंत मजल मारली आहे. आज (25 जून) सई 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. सांगली सारख्या निम शहरी भागातून आलेल्या सईचा सिनेसृष्टीतील प्रवास बराच चढ-उताराचा होता. मात्र या सार्यावर मात करून आज सईने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. आज सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्या बोल्ड आणि ब्युटिफूल अंदाजाने नेहमीच चर्चेत राहिलेल्या या सिनेमांची नक्कीच दखल घ्यावी लागेल. सई ताम्हणकरच्या आयुष्यात आला नवा बॉयफ्रेंड?
नो एंट्री पुढे धोका आहे...
मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात रूपेरी पडद्यावर पहिल्यांदा 'बिकनी' अंदाजात रसिकांसमोर येण्याची हिंमत सई ताम्हणकरने दाखवली. या सिनेमानंतर सई बद्दल अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या. तिचा हा बोल्ड आणी धाडसी अंदाज फिल्मी करियरसाठी टर्निंग पॉंईंट ठरला.
दुनियादारी
दुनियादारी या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला पुन्हा नवी झळाळी दिली. या सिनेमामुळे त्याच्याशी निगडीत सार्यांच्याच करियरला नवी दिशा म्हणाली असं म्हटलं जातं. दुनियादारी सिनेमात सईने तिच्या बोल्ड अंदाजापलिकडील तिच्या अभिनय कौशल्याचंदेखील कौतुक करायला भाग पाडलं.
हंटर
हंटर या सेक्स अॅडिक्शन वर भाष्य करणार्या बोल्ड विषयावरील सिनेमामध्ये सई आणि राधिका या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा समावेश होता. या सिनेमातील सईच्या अंदाजामुळेही खूप चर्चा रंगल्या होत्या.
लव्ह सोनिया
लव्ह सोनिया सिनेमा हा ह्युमन ट्राफिकिंगवर भाष्य करणारा आहे. या सिनेमामध्ये सई सोबत अनेक इंटरनॅशनल सेलिब्रिटींचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर या सिनेमाचं कौतुक झालं आहे. या सिनेमात सईने तिचं वजनही वाढवलं होतं.
तु ही रे
सई ताम्हणकर हे नाव समोर आलं की तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजातील अनेक सिनेमे समोर येतात. पण ग्रामीण, सोज्वळ भूमिकेमधूनही रसिकांना तिच्या अभिनयाचं कौतुक करायला भाग पाडणारा सिनेमा म्हणजे तु ही रे.. या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण आणि नात्याची गुंतागुंत उलगडली आहे.
वजनदार
View this post on Instagram
Do not miss the #worldtelevisionpremiere of #Vazandaar tomo on @zeeyuva at 12noon and 7pm !
वजनदार सिनेमामध्ये सई आणि प्रिया बापट या अभिनेत्रींनी त्यांच्या मर्यादेपलिकडे जाऊन 'बॉडीशेमिंग' या विषयावर भाष्य करणार्या धमाल सिनेमाची मेजवानी रसिकांना दिली. या सिनेमामध्ये सईने तिचं वजन वाढवलं.
सई ताम्हणकर आता मालिका,सिनेमा आणि डिजिटल माध्यमातूनही रसिकांच्या भेटीला आली आहे. आगामी गर्लफ्रेंड या सिनेमात सई आणि अमेय वाघ ही जोडी रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 26 जुलैला रसिकांच्या भेटीला येईल.