Mothers Day 2019: आज मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे (Mothers Day) म्हणून जगभर साजरा केला जात आहे. प्रत्येकजण त्यांच्या आईसाठी काही खास करत आजचा दिवस सेलिब्रेट करत आहे. परंतू नाना पाटेकरांनी(Nana Patekar) आज आईसाठी एक भावनिक पोस्ट लिहत त्यांच्या मनातील भावना मोकळ्या केल्या आहेत.'आई तीन महीन्या पूर्वी गेली आणि मी अचानक, मुलाचा, म्हातारा झालो. आता कोणी दम देत नाही...' असं हळवं ट्विट नाना पाटेकरांनी लिहलं आहे.
नाना पाटेकर ट्विट
आई तीन महीन्या पूर्वी गेली आणि
मी अचानक, मुलाचा, म्हातारा झालो.
आता कोणी दम देत नाही...
— Nana Patekar (@nanagpatekar) May 12, 2019
नाना पाटेकर यांच्या आईचं 3 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. वृद्धपकाळामुळे त्यांचं निधन झालं. स्वतःच्या वैयक्तित आयुष्याबद्दल फार सोशल मीडियात मोकळेपणाने व्यक्त न होणार्या नाना पाटेकरांच्या हळव्या मनाची बाजू रसिकांसमोर आली आहे. Happy Mother's Day 2019: मातृदिन निमित्त मराठी सेलिब्रिटींनी दिल्या आपल्या लाडक्या आईला शुभेच्छा
मागील काही दिवसांपासून MeToo च्या प्रकरणात नाना पाटेकरांचं नाव आलं होतं. त्यानंतर काही हिंदी सिनेमातून त्यांनी काढता पाय घेतला.