'चिप्पा' चित्रपटासाठी मुंबईकर बालकलाकार सनी पवार याचा  19th New York Indian Film Festival 2019 मध्ये  Best Child Actor पुरस्काराने गौरव
Sunny Pawar (photo Credits: Twitter)

मुंबईकर 11 वर्षीय सन्नी पवार (Sunny Pawar) या नवख्या कलाकाराचा 19 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल्स 2019 ( 19th New York Indian Film Festival) मध्ये सर्वोत्कृष्ट बालकार म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. सन्नी पवारला हा पुरस्कार 'चिप्पा' या चित्रपटासाठी देण्यात आला आहे. सन्नीने ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस (Garth Davis) यांच्यासोबत 'लायन' (Lion) या सिनेमामध्ये 2016 साली काम केले होते. 'चिप्पा' (Chippa) हा सिनेमा सफदार रेहमान यांनी लिहला आणि दिग्दर्शित केला आहे.

ANI Tweet

एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना सन्नी पवार याने पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद झाल्याचे सांगितले आहे. तसेच हा पुरस्कार त्याने आपल्या पालकांना अर्पण केला आहे. भविष्यात सन्नीला दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांच्याप्रमाणे मोठा अभिनेता होण्याचा मानस व्यक्त केला आहे. मोठा कलाकार होऊन मला माझ्या पालकांना माझा अभिमान वाटावा अशी कामगिरी करायची आहे. असं तो म्हणाला. तसेच यापुढे बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. सन्नी कुंची कुर्वे नगर या कलिना भागातील झोपडपट्टीमध्ये राहतो.

सन्नीची प्रतिक्रिया 

चिप्पा सिनेमाचा टीझर

काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे याला देखील हा  आगामी 'पाणी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे.