काल 28 जुलै 2024 रोजी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमिअर सोहळा प्रदर्शित करण्यात आला. बिग बॉसच्या घरात अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्स यांनी प्रवेश केला. या सोबतच एका रशियन गर्लने देखील यावेळी मराठी बिग बॉसच्या घरात एँट्री केली आहे.  इरिना रुडाकोवा असे या रशियन गर्लचे नाव असून ग्रँड प्रिमिअरमध्ये इरिनाने एंट्री करताच तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इरिनाला सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळाली. त्याचबरोबर नुकतीच ती एका मराठी रॅप सॉन्गमध्ये झळकली होती.  (हेही वाचा - Bigg Boss Marathi Season 5 Grand Premiere: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा भव्य ग्रँड प्रीमियर सोहळ्यात निक्की तांबोळीच्या दिलखेच अदा)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

इरिनाचं 'इरा राय' या नावाने सोशल मीडियावर अकाउंट असून तिचे दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.   इरीना आयपीएलपासून चर्चेत आली आहे. तिने आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून चिअर लीडर म्हणून काम केलंय. त्याचबरोबर इरिना योग प्रशिक्षकसुद्धा आहे. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा उजगावकर, अंकिता प्रभू वालावलकर, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळी, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर इत्यादी कलाकारांनी प्रवेश केला आहे.