Laxmikant Berde Birth Anniversary: सिनेसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जयंती निमित्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिले अभिवादन
मराठी चित्रपटसुष्टीत दिग्गज कलाकारांनी त्यांच्या वाढदिवसांनिमित्त खास आठवणी शेअर केल्या आहे.
सिनेसृष्टी अजरामर असं नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आज लक्ष्मीकांत बेर्डे यांचा वाढदिवस. मराठी चित्रपटसुष्टीत दिग्गज कलाकारांनी त्यांच्या वाढदिवसांनिमित्त खास आठवणी शेअर केल्या आहे. लक्ष्मीकांत आज आपल्यात नाही तरी देखील त्यांच्या कित्येक गोष्टी आपल्यासा आठवत असतात. मराठीत नव्हे तर हिंदी चित्रपटात देखील त्यांनी एक विनोदी तर भावनिक छाप तयार केली होती. लक्ष्मीकांत गेले अन् सिनेसृष्टीतलं एक पर्व गेल्यासारख होत. नाटक, मालिका, चित्रपट सृष्टीत त्यांनी आपली वेगवेगळी प्रतिमा तयार केली होती. कलाकार विश्वात आज त्यांच्या अनेकांनी पोस्ट शेअर करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. आपल्या विविधांगी अभिनयाने मराठी नाटक, दूरचित्रवाणी मालिका, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट असा कठीण पल्ला सहजगत्या पार करून सर्व रसिक प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी " लक्ष्या " त राहिलेले सुप्रसिद्ध मराठी अभिनेते तथा विनोदसम्राट " लक्ष्मीकांत बेर्डे " यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कला क्षेत्रातील अमूल्य योगदानास माझे विनम्र अभिवादन.
लक्ष्मीकांत बेर्डे हे कायमं प्रेक्षकांच्या मनाच कोरलं गेलेले आहे. बनवाबनवी चित्रपट अजूनही लक्ष्या आपल्यात असल्याची जाणीव देतो. ८०, ९० च्या दशकात लक्ष्यासोबत अनेक दिग्गज मंडळींनी काम केली. जस की, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्या जोड्या नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. हिंदी चित्रपटात लक्ष्यांनी केलेल्या कामाची बाब अमुल्यच आहे. त्यांचं अभिनय हे वैविध्यपुर्ण होत. अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकता येत पण जग जिंकणे हे सर्वांनाच जमतं असं नाही, तसंच काहीसं लक्ष्या यांच्या बाबतीत झालं आहे. अभिनयाची भुरळ पाडत त्यांनी जग जिंकले.