महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर हिंदवी स्वराज्य सांभाळलं ते म्हणजे छत्रपती ताराराणी (Chhatrapati Tararani) यांनी. मुघलांशी दोन करणार्या छत्रपती ताराराणी यांचा जीवप्रवास आता रूपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. आज (15 फेब्रुवारी) या चित्रपटाची पहिली झलक प्रसिद्ध करत सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkerni) यामध्ये छत्रपती ताराराणी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी या डॉ. जयसिंगराव पवार यांच्या साहित्यावर आधारित हा सिनेमा बेतलेला असून दिग्दर्शनाची धूरा राहुल जाधव सांभाळणार आहेत. तर संगीत अवधूत गुप्तेचं आणि संवाद पटकथा डॉ.सुधीर निकम यांची आहे.
दरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चा 'हिरकणी' नंतर हा पुन्हा ऐतिहासिक सिनेमा आहे. सोनालीच्या हिरकणी मधील कामाचं सार्याच स्तरातून कौतुक करण्यात आलं होतं. त्यामुळे आता पुन्हा तीला छत्रपती ताराराणी यांच्यासारख्या लढवय्या ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सोनालीने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे मोशन पोस्टर पोस्ट करत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. Fresh Lime Soda Poster: मराठी चित्रपट 'फ्रेश लाईम सोडा' चे पोस्टर प्रदर्शित, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे ही जोडी पुन्हा येणार एकत्र.
छत्रपती ताराराणी पहिलं मोशन पोस्टर
View this post on Instagram
'छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तुत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानातमक काम असेल,या जबाबदारी ची जाणिवही मला आहे.महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो,आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बास हीच प्रार्थना' असं सोनालीने म्हटलं आहे.
छत्रपती ताराराणी या छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी होत्या तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. राजाराम भोसले यांच्या पत्नी असण्यासोबतच त्यांची इतिहासामध्ये नोंद कणखर राजकारणी, कर्तुत्त्वान स्त्री असा देखील आहे.