Tiware Dam Incident: 'हा वध आहे की खून?' अभिनेता जितेंद्र जोशी याचा संतप्त सवाल

तर 24 जण अजूनही बेपत्ता आहेत.

Jitendra Joshi on Tiware Dam Incident (Archived, Edited, Representative Images)

गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण फुटून 9 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 24 जण अजूनही बेपत्ता आहेत. सात गावांत पाणी शिरले असून 12 घरे वाहून गेली आहेत. मात्र यापूर्वी धरणाला तडे गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी करुनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

यातच मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने सवाल उपस्थित केला आहे. (मने कोरडी रक्तानेही भिजली नाही... Jitendra Joshi ने कवितेच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना)

सोशल मीडियावर व्यक्त होत त्याने या प्रकरणी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. "अवघ्या २० वर्षांपूर्वी बांधलेलं तिवरे धरण फुटतं. आसपासच्या गावकऱ्यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. हा वध आहे की खून की दुर्लक्षिलेला मृत्यू!" या आशयाची पोस्ट लिहित त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जितेंद्र जोशी याचे ट्विट:

अतिशय संवेदनशील आणि सामाजिक जाणीवा शाबुत असलेला हा अभिनेता नेहमीच लेखन, कविता यांच्या माध्यमातून समाजातील परिस्थिती, प्रश्नांवर बोलत असतो. सोशल मीडियावर आपल्या भावना मांडत व्यक्त होत असतो.